सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा काळ ओळखा.

  1. अपूर्ण भविष्यकाळ
  2. रीती भविष्यकाळ
  3. पूर्ण भविष्यकाळ
  4. साधा भविष्यकाळ
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : पूर्ण भविष्यकाळ

Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - सुरेशने गाणे गायलेले असेल. हे पूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य आहे.

सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्यात सुरेशची गाणे गाण्याची क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली आहे म्हणून हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचे होईल.

पूर्ण भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो असेन.

Important Pointsकाळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ

वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.

भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात.

भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.

साधा भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. उदा. सुरेशन गाणे गाईल.

अपूर्ण / चालू भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. सुरेश गाणे गात असेल.

रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. सुरेश गाणे गात जाईल.

Hot Links: teen patti club apk teen patti neta teen patti king teen patti vungo teen patti master official